खुप वर्षानी तू आज भेटली,बघता,बघता क्षन,दिवस,वर्ष कसे संपले आपल्याला कळालेच नाही.
कधी काळी एका वर्गात शिकनारे आपन,एक डब्यात जेवनारे आपन,आज येवळे अनओळखी कसे झालो कुनास ठावूक,
तुला भेटण्या आगोदर,खुप विचार करून आलो होत.तुझ्याशी खुप काही बोलायच,तू ईतक्या वर्षात एकदाही मला का नाही भेटलीस?. म्हनुन नेहमी प्रमाने भांडायच होत..पन नाही ते नाहीच जमल,आणि तुला चांगलच ठाऊक आहे.मला तुझ्याशी नीट भांडताच येतच नाही.
कारण आज जर,तू रूसली असती तर मी तुला पुन्हा मनवु शकलोच नसतो.
असो,
आज जेंव्हा तु भेटली,तेंव्हा मनात एक वादळ सारख पेटल होत हो आठवनीच।
तुला एक सांगु तू आज ही तेवळीच सुंदर दिसतेस अगदी त्या "बालप्रेमाच्या पावसा सारखी"
तेंव्हा पावसाळेही खुप यायचे तुला मला भिजते पाहुन गालातल्या गालात लाजायचे आता कुनास ठाऊक पाऊस हा सारखा रडतच असतो हल्ली
तस,मीही या वायफळ पावसात भिजायच टाळतोच म्हणा ।
आज तुझ्यात,फरक जानवला,तो फक्त तुझ्यातला बालीशपनाचा,कदाचित जबाबदाय्रा वाळल्या असाव्यात,तुझ्या.
आणि हे काय ?
तु केस का कापले ?
ते तुझे पुर्वीचे छान होतेना,मोठे त्यात तू अजुन सुंदर दिसायची,"छे"
मला नाही आवळल हे तुझ ।
आठवतयं तू घराच्या कामत व्यस्त असली की तुझा घरचाअभ्यास अपुर्न असायचा,
मग,मी तुला माझी वहि देऊन स्व:ता मात्र मार खायचो.
"पन मी मुद्दाम असा वागायचो गं"
कारन बाईंची छळी खावुन लाल झालेल्या, सुजलेल्या,माझ्या हातावर तुझा कोमल,नाजुक हात तु प्रेमाने फिरवायची,आणि एका क्षनात माझे सारे दु:खने दुरव्यायचे.
आज सारच कस चुकल्या -चुकल्या सारख, वाटतय काळाच्या वादळात तुझा तो प्रेमाचा हात कुठे,कधी परका झाला,कळालेच नाही.
आणि तु खुप दुर निघुन गेली माझा नीरोप न घेताच
तुला एकदा ही मला भेटावस का नाही वाटल.?
पुढे मीही महाविद्यालयाच्या आरण्यात हरवुन गेलो.
पुढच्या वाटचाली साठी.
पन आज तुझा सु:खाचा संसार पाहुन मन भरल गं माझा
शेवटी तुझा निरोप घेताना,पाऊल खुप जड झाली होती,
हे जग खुप छोट आहे येथे लोक हरवत नाहीत बस सोबत चालताना वाटा चुकतात
मात्र ते ठरलेल्या वेळे नुसार पुन्हा भेटतातच
आपन जरी एक मेकाचे नाही झालो
तरी आपली मैत्रि अशिच असेल गं.
कधी-कधी प्रेम आणि मैत्रि यांच्यातला फरक ओळखने खुप कठिन जाते मानसाला,
"आपल नात मैत्रि नसावीच,कधाचित ते प्रेमही असुनये,
आपल नात याही पलीकळच आहे".आणि ते असेल,
ही आविष्याची प्रित विली आहे ,ज्याच्या,प्रतेक फांदिवर हजारो नात्यांची,रंगबेरंग फुले उमलतात काही फुलन्या आधीच कोमाजली जातात,पन प्रतेकाला एक नाव असतच,
आणि का असु नये.?
पन या "प्रीत"वेली वर कुठल्या तरी कोपय्राला, एक फुल अस उमलत,ज्याला कुठलच नाव नसत,नात नसत.
ते फुल ते नात,
प्रेमाच्या अलिकळे,आणि मैत्रिच्या पली कळच असत....
आविष्य भर तुझा नसुन ही तुझाच
©#प्रीत
(वरिल घटनेचा वास्तवाशी कुठलाच सबंध नाही असल्यास तो निवळ योगा योग समजावा)